माझ्या आजीने मला दिलेली शिकवण या लाॅकडाऊनच्या काळात भलतीच कामी आली. ती कायम म्हणते," कंटाळा यायला काय झालंय, जेव्हा इतक्या गोष्टी असतात करण्याजोग्या आणि शिकण्याजोग्या ! दाखव मला कुठे आहे तो तुझा कंटाळा ? आपण त्याला घालवून टाकूया ." लहानपणी माझ्याकडे तिच्या प्रश्नाचे उत्तर नसे, आजही नाही.पण तिच्या विचारांचा मात्र माझ्यावर खूप प्रभाव आहे.
ह्यामुळे झालं असं की,आमचे कंटाळा ह्या भावनेशी आणि कंटाळा येणाऱ्या व्यक्तींशी सुरुवातीपासून जरा वाकडंच ! 'कंटाळा आला' असं एकदा उच्चारलं की कंटाळा वाढतोच,असं आमचं ठाम मत, म्हणून तो मार्ग आम्ही कधीच सोडून दिला.मात्र ह्या लाॅकडाऊनच्या दिवसात माझ्या शिकवणीची खरी कसोटी झाली.
कधीच न आलेला कंटाळा ह्या दरम्यान नक्कीच येऊ शकला असता,...पण तसं झालं नाही. हा अवघड काळ देखील अतिशय चांगला आणि सन्मार्गी लागला. खूप काही झक्कास बनवलं का, तर नाही; पण जे काही बनवलं त्याने वेळ मस्त गेला.
अर्थात ह्या संकटकाळात कंटाळा न करता, घराबाहेर जाऊन काही लोकसेवा करता आली असती तर अधिक समाधान मिळालं असतं, असंही वाटतं आणि खंत वाटते !
Tried my hand at coffee painting
Doodling!
First attempt at warli painting and first attempt at paining a wall
No comments:
Post a Comment